अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राहाता तालुक्यातील वाकडी येथील राहत्या घरातून दोन दिवसांपासून गायब असलेल्या आयुब मोहम्मद शेख (वय ४५) या व्यावसायिकाचा मृतदेह त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरील सार्वजनिक विहिरीत आढळला.
त्यांचा गावातील शिवाजी चौकात अंडापावचा व्यवसाय होता. २१ एप्रिलला सकाळी शेख गायब झाले होते. शोध घेऊन ते सापडले नाही.

file photo
गावातील सार्वजनिक विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत एका युवकाने बघितला.
सरपंच डॉ. संपतराव शेळके यांनी श्रीरामपूर पोलिसांना ही माहिती दिली. श्रीरामपुर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|