नियमांचे उल्लंघन करणे ‘त्यांना’ पडले महाग..!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- सकाळी अकरानंतर दुकानात ग्राहकांची गर्दी करून व्यावसाय करत असलेल्या १० दुकानांवर सोनई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

सोनई- घोडेगाव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, महावीर पेठ, नवीपेठ आदी भागांत सकाळी ११ वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी असताना शासन नियमांचे उल्लंघन होत

असल्याचे लक्षात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहायक फौजदार संजय चव्हाण, हवालदार दत्तात्रेय गावडे, शिवाजी माने,

बाबा वाघमोडे यांच्यासह पथकाने अचानक भेट देऊन कारवाई केली. दहा दुकानदारांकडून साडेनऊ हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले.

या पुढेही अशी कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. सर्व नागरिकांनी कोरोनासंदर्भात नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी सुचना ध्वनिक्षेपकावरुन देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe