भाेंदूबाबाची लबाडी : पैसे दुप्पटचे अमिष आणि झाली साडेचार लाख रुपयांची फसवणूक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे तालुक्यात आता पैसे दुप्पट करुन देण्याची भोंदुगिरी समोर आली आहे,पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवून एका व्यवसायिकाला दोघांनी साडेचार लाखांना गंडा घातला आहे.

बँकेचे असलेले कर्ज फेडण्यासाठी तुम्ही रोख पैसे घेऊन या आम्ही ती रक्कम दुप्पट करून देतो असे सांगून करमाळा येथील दत्तात्रय महादेव शेटे यांची साडेचार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार १३ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता हिरडगाव शिवारात साईकृपा कारखान्याजवळ घडला आहे

दत्तात्रय शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमाविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की करमाळा येथील शेटे याना दोन अज्ञात व्यक्तींनी तुमच्यावर असलेलं बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही रोख रक्कम घेऊन

या आम्ही ती रक्कम दुप्पट करून देतो असे सांगितले त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आमिषाला बळी पडून शेटे हे साडेचार लाख रुपये घेऊन १३ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हिरडगाव येथील साईकृपा कारखाना परिसरात आले

त्यानंतर या दोन अज्ञात इसमांनी शेटे यांच्याकडून साडेचार लाख रुपये रोख रक्कम घेऊन शेटे यांच्या हातात तांदूळ,लिंबू,फुले ठेवून सदरची रक्कम भगव्या कपड्यामध्ये बांधून ती कारच्या डिकीमध्ये ठेवली व शेटे यांना कारला प्रदक्षिणा मारण्यास सांगितले प्रदक्षिणा मारत असतानाच

या दोन भामट्यानी डीक्कीतील साडेचार लाख रुपये रोख रक्कम काढून घेतली अश्याप्रकारे रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एवढया मोठ्या रकमेची फसवणूक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe