अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जिल्ह्यातील गुन्हेगारी आता सर्वोच्च शिखर गाठू लागली आहे. खून, चोऱ्या, दरोडे आदी घडत असताना शिर्डीमध्ये एक खून झाल्याची माहिती समोर येते आहे.
शिर्डी येथील रहिवासी असलेल्या राजू धिवर (वय 42) या इसमावर मंगळवारी सायंकाळी चार अज्ञात हल्लेखोरांनी अंगाखांद्यावर धारदार शस्राने वार करून गंभीररित्या जखमी केले होते. उपचारादरम्यान धिवर यांचा मृत्यू आहे.
यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता तालुक्यातील कोर्हाळे
येथील दुहेरी हत्याकांडातील घटनेला 72 तास उलटत नाही तोच शिर्डीत 42 वर्षीय राजू आंतवन धिवर यांंना चौघा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्राने वार करून ठार मारल्याची घटना घडली आहे.
मारेकरी अद्यापही पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. मात्र राजू धिवर यांच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आरोपींना आमच्यासमोर जोपर्यंत हजर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,
अशी ठामपणे भूमिका घेत साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम