अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अहमदनगर आर्किटेक्ट, इंजिनिअर्स ॲण्ड सव्र्हेअर असोसिएशन आणि क्रिडाई संघटनेच्या वतीने सिमेंट व स्टील दरवाढी विरोधात शुक्रवार दि.१२ रोजी देशव्यापी धरणे आंदोलन व एक दिवसाचा संप करण्यात येणार आहे.
या दरवाढीला आळा घालण्यासाठी व संस्थेच्या या मागण्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी, तसेच सर्वसामान्यांना दर कमी झाल्यावर बांधकाम करणे शक्य होण्यासाठी सदर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासकीय विश्रामगृह मागील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे संस्थपक अध्यक्ष जवाहर मुथा यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून स्टिल व सिमेंटच्या दरामध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. सिमेंट जवळपास २५ टक्के तर स्टिल ५० टक्के महाग झाले आहे.
नगरमध्ये काम करणाऱ्या आर्किटेक्स् इंजिनिअर्स ॲण्ड सर्वेअर्स असा, के्रडाई आणि बिल्डर्स असो.ऑफ इंडिया, अहमदनगर सेंटर वतीने या दरवाढीचा निषेध करत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
संपूर्ण देशात एकाच वेळी हे आंदोलन होणार आहे. तिन्ही संघटनाचे नगरमध्ये २००० पेक्षा जास्त इंजिनिअर्स, बिल्डर्स बांधकाम व्यवसाय करत असून या सातत्याने होणाऱ्या दरवाढीने हा व्यवसाय धोक्यात आलो आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved