Oppo 5G smartphone : आत्ताच खरेदी करा Oppo चा ‘हा’ 5G फोन, वाचतील तुमचे 12 हजार रुपये

Ahmednagarlive24 office
Published:

Oppo 5G smartphone : मार्केटमध्ये सतत नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असणारे 5G स्मार्टफोन लाँच होत असतात. उत्तम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समुळे या सर्वच स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त आहेत. परंतु, तुम्ही आता खूप स्वस्तात स्मार्टफोन विकत घेऊ शकता.

Oppo च्या F19 Pro+ 5G या स्मार्टफोनवर 12,000 रुपयांची बचत करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. या फोनची किंमत 29,990 रुपये असून तो तुम्ही 17,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. कारण यावर बँक ऑफर तसेच एक्सचेंज ऑफर मिळत आहे.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनी या फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देत असून जो 180Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट आणि 800 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येत आहे. स्टोरेजचा विचार करायचा झाला तर हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. यात MediaTek Dimension 800U चिपसेट प्रोसेसर दिला आहे.

कंपनीकडून या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस चार कॅमेरे देण्यात आले आहे. यामध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगलसह 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2-मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा यांचा समावेश असणार आहे. तसेच सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4310mAh ची बॅटरी दिली आहे. जी 50W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करत आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर 3.0 आणि फेस अनलॉकसह येणारा हा फोन Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर काम करतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे अप्रतिम फीचर्स दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe