Cyclon:- सध्या मान्सूनचे आगमन अंदमान बेटांवर झाले असून 31 तारखेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र संपूर्ण भारतात तप्त अशी उष्णतेची लाट असल्याचे दिसून येत असून बहुसंख्य राज्यांमध्ये पारा 40 ते 45 अंशांच्या दरम्यान आहे व महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पारा हा 40° च्या पुढे असून नागरिक हैराण झाल्याची सध्या स्थिती आहे. तसेच राज्यामध्ये अवकाळी पावसाचा देखील काही ठिकाणी कहर सुरूच आहे.
त्यातच आता हवामान विभागाच्या माध्यमातून महत्वाची माहिती देण्यात आली आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने चक्रीवादळाची निर्मिती होत आहे व यामुळे देशात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्या ठिकाणी चक्रीवादळाचे निर्मिती होत आहे व यामुळे संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व या चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओडिशा तसेच आंध्र प्रदेश व इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशांना बसण्याची व त्या ठिकाणी मोठा हवामान बदलाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रावर होईल का काही परिणाम?
या सगळ्या परिस्थितीमुळे येत्या दोन ते तीन दिवसात या चक्रीवादळाचा काही प्रमाणात का होईना महाराष्ट्रवर देखील काही प्रभाव दिसून येईल अशी शक्यता आहे. तयार होत असलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता असून या कालावधीमध्ये 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा देखील हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आला.
महाराष्ट्रातील या भागात वादळी पावसाची शक्यता
महाराष्ट्रामध्ये सध्या संमिश्र वातावरण असून कुठे उष्णतेची लाट तर कुठे पाऊस अशी स्थिती आहे. तसेच पुढील काही दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाडा तसेच कोकण सह विदर्भामध्ये पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये उष्णतेच्या झळा असण्याची शक्यता देखील असून या ठिकाणी तापमानामध्ये एक ते दोन अंशांनी वाढ होण्याच्या अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण इत्यादी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
तसंच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसायट्याचा वारा व त्यासोबतच हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पुढील तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाच्या माध्यमातून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने सोसायट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.