Indian Railway : रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोपा आणि कमी खर्चिक आहे. त्यामुळे या रेल्वेला ‘भारताची लाईफ लाईन’ असे म्हटले जाते. तुम्ही कधी ना कधी रेल्वे प्रवास केला असेल किंवा तुम्ही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल. परंतु, तुम्हाला रेल्वे प्रवासादरम्यान तिकीट तपासणीचे नियम माहीत आहेत का?
तुमचे तिकीट कोण तपासू शकते? तिकीट तपासणीचे नियम काय आहेत? हे जाणून घेणे प्रवासी म्हणून आपला हक्क आहे. तुम्हाला हे नियम माहीतच असावेत. लवकरात लवकर हे नियम जाणून घ्या. नाहीतर तुम्ही एखाद्यावेळेस खूप मोठ्या संकटात सापडू शकाल.

काय सांगतो नियम?
जर रेल्वेच्या नियमांबद्दल बोलायचे झाल्यास नियमांनुसार फक्त टीटीईच प्रवाशांचे तिकीट तपासू शकते. कारण रेल्वे पोलिसांना तिकीट तपासण्याचे अधिकार नाहीत.
काय काम असते रेल्वे पोलिसांचे?
दरम्यान रेल्वे पोलिसांचे काम प्रवाशांच्या सुरक्षेचे असून ते त्यासाठी तैनात असतात. त्यामुळे त्यांना कधीही कोणत्याही प्रवाशाचे तिकीट तपासता येत नाही.
कोणाला तपासता येते तिकीट?
रेल्वेच्या नियमांनुसार,रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे तपासण्याचा अधिकार फक्त टीटीईला आहे. त्यामुळे जर या प्रवाशाकडे तिकीट नसेल तर टीटीईला दंड आकारण्याचा अधिकारही आहे.
करता येते तक्रार
समजा जर तुम्हाला एखाद्या रेल्वे पोलिसांनी तिकीट मागितले किंवा तुम्हाला धमकावले तर तुम्हाला TTE किंवा रेल्वे अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते. तर दुसरीकडे, जर TTE तुमच्याकडून दंड किंवा तिकिटाचे पैसे घेऊन स्लिप किंवा तिकीट देत नसेल, तर तुम्हाला त्याबद्दल रेल्वे अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते.