अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-ज्या ठिकाणी धरण असते त्या भागातील शेतीसाठी कालव्याच्या माध्यमातून शेती सिंचनसाठी पाणी पुरवठा केला जातो.
मात्र अनेकवेळा कालवे नादुरुस्त झाल्यामुळे हे पाणी आजूबाजूला असलेल्या शेतात पसरून उभी पिकं वाया जाण्याच्या घटना घडत असतात.
असाच प्रकार पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी परीसरात झाला आहे. येथील कोपरे हद्दीतील रस्त्यावरील मुळा कालव्याला सध्या पूर्ण दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे हे पाणी कालव्यांमधून न शेजारील शेतात गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून त्याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले होते.
सदर भाग दुष्काळी पट्टयाचा असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असताना संबंधीत अधिकार्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी तसेच सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई
करण्यासाठी रामदास बर्डै, रामेश्वर कर्डीले यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. उपविभागीय अधिकारी कु. सा.रा.पाटील यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|