अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- प्रभाग क्र. ११ चे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांनी अनेक वर्षापासून झेंडीगेट वेलजी हाइट्सच्या शेजारी मुकुंदनगर व सैदू कारंजा मशिदी समोर अशा अनेक ठिकाणी त्यांनी अवैद्य बांधकाम व अतिक्रमण केलेले आहे.
या विरोधात तक्रारदार सय्यद अरबाज एजाज हुसेन यांनी अनेक दिवसापासून महानगरपालिका, जिल्हाधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, यांच्याकडे तक्रार दाखल केली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/bf72cfea-a339-433a-800f-33f3c71caf5e.jpg)
परंतु राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्यामुळे प्रशासनावर दबाव टाकून तक्रारीचा कोणताही उपयोग झाला नाही. तक्रारदार यांनी नज्जू पैलवान यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका दाखल केली आहे.
यामध्ये तक्रारदार सय्यद हुसेन एजाज यांनी म्हटले आहे की, नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांनी शासनाची घोर फसवणूक केली आहे. अनेक ठिकाणी अवैध बांधकाम व अतिक्रमण केले आहे.
कायद्यानुसार नगरसेवक पद रद्द व्हावे, याकरिता नाशिक विभागीय उच्च दर्जाची समितीमार्फत यांची चौकशी करून राष्ट्रवादीचे नगरसेवक यांचे नगरसेवक पद रद्द करावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. असे तक्रार अर्जामध्ये नमूद केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|