काेरोनाची आणि माझी दोस्ती झालीय ! माझी भेट झाल्यावर रुग्ण पन्नास टक्के बरा होतो…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार नीलेश लंके यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून करोना रुग्णांसाठी धावून जाण्याचे काम केल्याचे गौरवाेद्गार जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे पारनेर प्रसिद्ध आहे. आता नीलेश लंके सेवेच एक नव युग पारनेरकारांना दाखवतील, असे सांगत पाटील यांनी आमदार लंके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी येथे सुरू असलेल्या १ हजार १०० बेडच्या शरद पवार आरोग्य मंदिरास पाटील यांनी शनिवारी रात्री भेट दिली.

यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, येथील आरोग्य मंदिराविषयी आजवर ऐकत होतो. प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यानंतर येथे रुग्णांची किती काळजी घेतली जाते हे लक्षात येते.आमदार लंके यांचा व ते करीत असलेल्या सेवेचा मला, पक्षाला अभिमान आहे.

रुग्णांची सेवा करण्याचे व्रत माणुसकीच्या भावनेतून आमदार लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले.खऱ्या अर्थाने लोकांचा प्रतिनिधी म्हणून एक नवा आदर्श त्यांनी राज्यापुढे उभा केला.

गेल्या वर्षभरापासून मी काेरोना रुग्णांची सेवा करतोय. हजारो रुग्णांशी संपर्क आल्याने रुग्णास काय औषधोपचार करावा लागेल, याचा मलाही चांगला अनुभव आला. काेरोनाची व माझी दोस्ती झाली.माझी भेट झाल्यावर रुग्ण पन्नास टक्के बरा होतो. अनुभवातून मी देखील डॉक्टर झालो, असे सांगताना सुमारे शंभर रुग्णांना आपण मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.”- नीलेश लंके, आमदार, पारनेर.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News