काळ्या बाजारात चालवलेला तांदूळ पकडला!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात घेवून जाणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी मालट्रकसह ताब्यात घेतले आहे. गोविंद विद्यासागर वाघमारे, राहुल भगवान घोरपडे (दोघे रा.कलांडी ता निलगा जि. लातूर )अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील अरणगाव बायपास येथे रात्रीच्यावेळी रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात घेवून जात असताना गोविंद विद्यासागर वाघमारे,

राहुल भगवान घोरपडे व त्याचा अनोळखी साथीदार ट्रकने सदरचा माल वाहतूक करत असताना नगर तालुका पोलिसांनी पकडले.

या या कारवाईत १० लाख रुपये किंमतीचा ट्रक व ७ लाख रुपयांचा तांदूळ असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार नगर तालुका पोलिसांनी केली. वाघमारे व घोरपडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून,

त्यांच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe