कांद्याला मिळाला नीचांकी दर !! शेतकरी झाले ‘हवालदिल’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- मागील वर्षी समाधानकारक पडलेल्या पावसामुळे आज देखील पाण्याची स्थिती चांगली असल्याने उन्हाळी कांद्याचे उत्पादन वाढले आहे. मात्र भाव सपाटून पडले आहेत.

कालच्या लिलावात एक नंबरचा कांदा अवघा १३०० ते १५०० रुपये या दराने विकला गेला. गेल्या महिनाभरापर्यंत कांद्याला जवळपास ३ हजारांपर्यंत भाव मिळतहोता.

परंतु १ मार्चपासून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येत असल्याने प्रत्येक लिलावात भाव घसरत आहेत. त्याचा परिणाम तीन हजारावर असलेला कांदा अडीच, दोन व आता तर थेट दीड हजारांपर्यंत खाली आला आहे.

गेल्या वर्षभरात कांद्याचे भाव टिकून होते. दिवाळीच्या दरम्यान तर कांद्याच्या भावाने दहा हजार रुपयांपर्यंत मजल मारली होती. हाच भाव टिकून राहील या अंदाजाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली.

याच वेळी इतर राज्यांतही पाण्याची उपलब्धता असल्याने तिकडेही कांद्याचे उत्पादन घेतले गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.

मागणी घटल्याचा व आवक वाढल्याचा परिणाम आता भाव कोसळले आहेत . गुरुवारी नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात ७३ हजार ३३३ कांदा गोण्यांची आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला अवघा १३०० ते १५०० रुपयांचा भाव मिळाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe