‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी साजरा केला ‘ब्लॅक डे’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीर खोर्‍यात पुलवामा जिल्ह्यामध्ये जो भारतीय जवानांवर हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून पुणतांबा येथील नेहरू चौकामध्ये बिइंग सोल्जर ग्रुपच्यावतीने व्हॅलेंटाईन डे ऐवजी ब्लॅक डे म्हणून साजरा करण्यात आला.

14 फेब्रुवारी म्हंटले कि सगळीकडे व्हॅलेंटाईनचा उत्साह दिसून येतो. मात्र याचा दिवशी गेल्या 2 वर्षांपूर्वी भारतीय सैन्याच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

या घटनेत अनेक सैनिक शहिद झाले होते. यामुळे बिइंग सोल्जर ग्रुपच्यावतीने भारतीय जवानांना श्रद्धांजली म्हणून मशाल पेटवून, मशाल मार्च काढण्यात आला. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देऊन नेहरू चौकापासून ते स्टेशन रोडपर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली.

तरुणांमध्ये आपल्या भारतीय जवानाबद्दल आदर व देशाबद्दल प्रेम राहावे, व्हॅलेंटाईन डे सारखे परकीय दिवस साजरा न करता, तो दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करावा हीच खरी शहीद जवानांना श्रद्धांजली ठरेल. याप्रसंगी अशोक इंगळे, अमोल जगदाळे, कपिल बागुल, शुभम जेजूरकर, रोहित जेजूरकर,

प्रसाद गायकवाड, स्वप्नील पाटील, रामदास धनवटे, मनोज गुजराथी, ओम उदावंत, सोहम साळी, अमोल धोत्रे, कुणाल शेजुळ, रुपेश साळुंके, सागर डुक्रे, चंद्रकांत सोनवणे, प्रतीक धनवटे, विकी माने, प्रतीक बत्तीसे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe