मराठा आरक्षणासाठी केंद्राने मागासवर्गीय आयोग नेमावा : माजीमंत्री ढाकणे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यास केंद्र सरकारच कायदा करु शकते.

मराठा आरक्षणाला माझा पाठींबा आहे मात्र तो विषय केंद्राच्या कक्षेतला असल्याने घटनेतील तरतुदीनुसारच मराठा आरक्षण देणे शक्य आहे.

कायदा जाणणाऱ्या माणसांनी चुकीच्या ठिकाणी आरक्षण मागुन वेळ वाया घालु नये असे मत माजी केंद्रीय मंत्री बबन ढाकणे यांनी व्यक्त केले.

रविवारी रात्री स्थानिक पत्रकारांशी बोलताना ढाकणे म्हणाले, मंडल आयोग धर्तीवर मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने मागासवर्गीय आयोग नेमावा.

आयोगातुन प्राप्त निकषानुसार मराठा समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक मागासलेला आहे हे सिद्ध करावे.

संसदेत दोनतृत्यांश बहुमतानी मराठा आरक्षण कायदा करत राष्ट्रपती मंजुरी नंतर त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात यावे.

ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारातील राजकीय आरक्षण काढण्याचा निर्णय धक्कादायक आहे.

हा निर्णय केंद्राने मागे घेत ओबिसीची जातनिहाय जनगनना करण्याची मागणी ढाकणे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News