Central Government : देशात स्वयंरोजगार (self-employment) वाढवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे. या योजनेतून लघुउद्योगांना कर्ज (Small industries) देऊन प्रोत्साहन दिले जाते.
ही योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू झाली. PMMY मध्ये, MUDRA म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी होय. स्वयंरोजगारासह रोजगार निर्मिती हा या योजनेचा उद्देश आहे. पीएम मुद्रा योजनेंतर्गत तीन प्रकारची कर्जे दिली जातात, ती म्हणजे शिशु, किशोर आणि तरुण. शिशूमध्ये अर्जदार 50,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतो.
किशोरमध्ये अर्जदाराला 50,001 ते 5,00,000 पर्यंत कर्ज दिले जाते. त्याचबरोबर तरुण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला 5,00,001 ते 10,00,000 पर्यंतचे कर्ज दिले जाते. पीएम मुद्रा योजनेत कर्जाची कमाल मुदत 5वर्षे आहे.
मुद्रा लोन घेतल्याचे फायदे
पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँक किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही सुरक्षा जमा करण्याची गरज नाही. यावर सरकार तुमच्या कर्जाची हमी देते. यावर प्रक्रिया शुल्कही खूप कमी आहे. तसेच, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक गटातील लोकांना या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यावर व्याजदरात सूट दिली जाते.
मुद्रा योजनेत कोणत्या गोष्टींसाठी कर्ज दिले जाते
मुद्रा योजनेतील कर्ज व्यावसायिक क्रियाकलाप पुढे नेण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते. यामध्ये अर्जदाराचे व्यावसायिक वाहन – ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, टॅक्सी ट्रॉली, ई-रिक्षा; सेवा – जिम, सलून, शिवणकामाचे दुकान, वैद्यकीय दुकान, ड्राय क्लीनिंग, फोटोकॉपी; खाद्यपदार्थ- लोणचे, पापड, आइस्क्रीम, बिस्किटे, मिठाई; या योजनेंतर्गत कृषी उपकरणे, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन आणि पशुपालन इत्यादींसाठीही कर्ज दिले जाते.
महिलांना मोठा लाभ मिळेल
प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत सरकार महिला उद्योजकांनाही प्रोत्साहन देते. महिला उद्योजकांसाठीच्या योजनेच्या अटी व शर्ती इतर लोकांप्रमाणेच आहेत. यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते.