अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-पेट्रोल-डिझेलप्रमाणे 100 टक्के इंधन म्हणून इथेनॉल वापरण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखाने आणि लाखो शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यात सर्वाधिक 23 साखर कारखाने आहेत. यापैकी 9 साखर कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प आहेत.
यात नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर (लोकनेते मारूतराव घुले पाटील), प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील, शेवगावमधील गंगामाई, श्रीरामपुरातील अशोक,
कर्जतमधील अंबालिका, श्रीगोंद्यातील साईकृपा, कोपरगावातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (संजीवनी) आणि कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळे या साखर कारखान्यांचा समावेश आहे.
या कारखान्यांतून दररोज 4 लाख 15 हजार लिटर इथेनॉल निर्मिती होते. तसेच मुळा, संगमनेर(सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात आणि वृध्देश्वर या कारखान्यांचे प्रकल्प प्रस्तावित आहे. इथेनॉलचा वाढता वापर होणार असल्याने शेतकर्यांचे उत्पन्नही वाढेल.
कारण इथेनॉल ऊस, मका आणि इतर अनेक पिकांपासून बनविले जाते. साखर कारखानदारांना मिळकत करण्याचा एक नवीन मार्ग मिळेल, जेणेकरून त्यांच्या शेतीतील थकबाकी परतफेड करू शकतील.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|