केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी !पालकमंत्र्यांची टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकारने लसीकरण करावे असे सांगते तर दुसरीकडे डोस देणाऱ्या कंपन्यांना धमक्या द्यायच्या. असे सूत्र केंद्र सरकार अवलंबत आहे.

या काळात हे योग्य नाही. जसे पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवून त्याऐवजी ममता बॅनर्जी यांचा फोटो वापरला आहे.

तसे आम्ही ही करायचे का ? मग ना. थोरात व अजित पवार यांचे फोटो वापरावेत का? पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यामध्ये दीड हजार कोटी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते.

परंतु केंद्र सरकारने त्यांना धमकी दिली आणि त्यामुळे हे डोस राज्याला मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने आपली दुटप्पी भूमिका सोडावी.

असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. पुढे म्हणाले की, निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडनविरोधात प्रचार केला होता. नमस्ते ट्रम्प म्हणून या देशात ट्रम्प यांना आणले होते.

असे असताना देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी भारतासाठी पंचवीस हजार कोटी डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

तसेच आता हे सर्व सोडून केंद्राने लसीकरणाचे पूर्ण नियंत्रण आपल्या हातात घ्यावे व पुढील ६ महिन्यात सरसकट लसीकरण करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe