अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले.
यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सरसावले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव येथील ग्रामीण रूग्णालय येथे उपचार घेत असलेल्या

file photo
कोरोना बाधित रूग्णांसाठी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सेंट्रल ऑक्सिजन लाईनचे लोकार्पण तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना बाधितांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी काही दानशूर पुढे आपले व त्यांच्या आर्थिक योगदानातून सेंट्रल ऑक्सिजन लाईन २० खाटांसाठी बसविण्यात आली आहे.
यासाठी साडेतीन लाख रूपये खर्च आला आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांसाठी हि ऑक्सिजन लाईन जीवदान ठरणारी असल्याचे प्रतिपादन उपस्थितांनी केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम