राज्याला १६६१ मेट्रिक टन ऑक्सिजन उचलण्यास केंद्राचा होकार

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-केंद्र सरकारने महाराष्ट्राची ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन १६६१ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून उचलण्यास मान्यता दिली आहे.

हा ऑक्सिजन अद्यापि राज्याला मिळालेला नसून सध्या महाराष्ट्र सरकार स्वखर्चाने दररोज ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन विकत घेत आहे.

महाराष्ट्राला लागणारा जास्तीचा ऑक्सिजन राज्य सरकार ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’कडून विकत घेत अाहे.

जवळपास ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन यासाठी विकत घेण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या नागपूर, हैदराबाद व गुजरात येथील प्लांटमधून हा ऑक्सिजन घेण्यात येत असून वाहतुकीसह सर्व खर्च राज्य सरकार करत आहे.

राज्यात सध्या ६२ हजाराहून जास्त ऑक्सिजन बेड असून वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता आता केंद्राकडून जास्तीच्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याला मान्यता मिळणे गरजेचे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील विविध राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेतला. त्यावेळी ऑक्सिजनची सर्वाधिक गरज असलेल्या बारा राज्यांची एकत्रित मागणी ४८०० मेट्रिक टन एवढी होती.

त्यानंतर नव्याने आढावा घेतला असता ही मागणी सहा दिवसात वाढून ५,७६० मेट्रिक टन प्रतिदिन एवढी झाली. केंद्र शासनाचे काही प्रमुख विभाग तसेच देशातील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची बैठक होऊन राज्यांची मागणी व पुरवठा याचा अभ्यास करण्यात आला.

त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव निपुण विनायक यांनी संबंधित राज्यांना २१ एप्रिल रोजी पत्र पाठवून प्रत्येक राज्याला किती ऑक्सिजन कंपन्यांकडून उचलता येईल ते स्पष्ट केले. या पत्रानुसार महाराष्ट्राला १६६१ मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe