अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- बैलगाडा शर्यतवरील शासनाने घातलेली बंदी त्वरीत उठवावी. अन्यथा नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा रविंद्र मोरे यांनी दिलाय.
तसेच राहुरी तालूका बैलगाडा संघटनेच्या वतीने महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दिनांक ५ ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील बैलगाडा संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ

तसेच नायब तहसीलदार डमाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. ती बंदी उठवण्यात यावी.
या मागणीसाठी राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर बाजार समिती समोर दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
जोपर्यंत बैलगाडा संघटनेच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन होत राहील. असे निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या फिर्यादीवर रविंद्र मोरे, महेश हापसे, अच्युत दुशिंग, अनिल गायकवाड,
बाळासाहेब खुळे, कैलास आढाव, सोमनाथ कर्पे, रविंद्र हापसे, धनंजय काळे, विनोद तमनर, भगवान डोंगरे, अभिजित कोकाटे, अलिम पठाण, अविनाश गागरे, दादा बाचकर, पंकज यादव, भैय्या ढोकणे, दिशांत हरिश्चंद्रे, राहुल तमनर आदींच्या सह्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम