पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :-  राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार कोसळत आहे.

त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे.मुंबई शहरात सखल भागात पाणी साचले आहे.

असाच पावसाचा जोर कायम राहिला तर पुन्हा पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकड मुंबई उपनगरांमध्येही पावसाची संततधार दिसून येत आहे. दरम्यान, पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!