अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- येणाऱ्या पाच दिवसात जिल्ह्यात वातावरण अंशतः ढगाळ राहणार आहे, 7 व 9 मे रोजी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्तवला आहे.
राहुरी विद्यापीठातील हवामान विभागाने अंदाज वर्तवताना काही सूचनाही केल्या आहेत, त्यानुसार पुुढे पाच दिवस हवामान अंशतः ढगाळ राहील, 7 व 9 मे रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडेल.
पावसाची शक्यता असल्याने कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकखाली झाकून ठेवावीत, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, पिकांची काढणी शक्यतो सकाळच्या वेळेत करावी,
पावसाच्या शक्यतेने विदुयत उपकरणं संपर्क टाळावा, जनावरांना उघड्यावर चरायला सोडू नका, झाडाखाली बांधू नका, पावसाचा अंदाज घेऊनच शेतीची कामे करा इत्यादी सल्ले राहुरी कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिला आहे
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|