चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा सोडून शिवसेनेत …

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील इमारतीच्या भूमीपूजन व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता असून तशी गडबड मला दोन दिवसात दिसत आहे. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही,

असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचं सांगताना कोणतेही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजप सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे.

कारण शिवसेनेते काही लोक येण्याची शक्यता आहे. तशी गडबड मला दोन दिवसात दिसतेय. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही,

असा चिमटा पाटील यांनी काढला. दरम्यान जयंत पाटील यांच्या हस्ते वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा- दुधगाव रस्ता,

बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले.

वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना सहा वर्षीय संचित गावडेही तिथे उपस्थित होता. आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून संचितलाही याचं कुतूहल वाटलं.

मोठी हिंमत करुन संचितने जयंत पाटील यांच्याकडे नारळ फोडण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जयंत पाटील यांनीही त्याला नारळ फोडून देत इच्छा पूर्ण केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe