अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-पुरोगामी महाराष्ट्र म्हणून घेणार्या महाराष्ट्रात अनेक गावे, रस्ते व वस्त्यांची नावे जात व धर्माच्या आधारे संबोधले जात आहेत. त्यामुळे या विभागातील समाजमन दुषित होण्यास मदत होते.
यामुळे राज्यातील गावे, वस्त्या व रस्ते यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्यासंदर्भात राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्वतंत्र समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यात सामाजिक सलोखा निर्माण होऊन त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल असेही नमूद केले आहे यापूर्वी राज्यात मंत्रिमंडळाने यासंदर्भातील निर्णय घेतला होता.
ग्रामीण भागातील वस्त्या, रस्ते व गावांची नावे बदलणे संदर्भात ग्राम विभागाने तर शहरी विभागातील नावे बदलण्यासाठी नगर विकास विभागाने कार्यवाही संदर्भात आदेशित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गावे, रस्ते व त्यांची नावे बदलण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांचे अध्यक्षतेखाली सरकारने समिती निश्चित केली आहे.
या जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिव म्हणून काम पाहणार असून, सदस्य म्हणून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्याधिकारी नगरपरिषद नगरपंचायत व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
दरम्यान शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक गावांची व रस्त्यांची नावे बदलत असल्यामुळे महापुरुषांच्या वाटेने जाण्याच्या या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|