कोरोना लस घेतल्यानंतर शुक्राणूंच्या संख्येत आणि क्षमतेत बदल होतो ? वाचा महत्वाची माहिती !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- लसीकरणानंतर शुक्राणूंच्या संख्येत आणि क्षमतेत कोणताही बदल झाला नाही, असे इस्राईली अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

या अभ्यासासाठी संशोधकांनी ४३ जणांचे शुक्राणू नमुने घेतले होते. या ४३ जणांनी एका महिन्याभरापूर्वी लसीकरण केले होते. त्यामुळे फायझर-बायोएनटेक लस आणि शुक्राणूंचा संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

इस्राईली अभ्यासकांनी शुक्राणूंमधील घटक, संख्या आणि गतिशीलता यात कोणताही बदल झाला नसल्याचं सांगितलं आहे. या बाबतचा संपूर्ण अहवाल मेडआरक्झिववर प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानंतर जगभरातील तरुणांमधील गैरसमज दूर होणार आहे.

त्यामुळे पुरुषांना लसीकरण करताना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच गर्भधारणेसाठी इच्छुक असलेली जोडपीही लसीकरण करु शकतात. कारण या लसीचा शुक्राणूंवर काही एक परिणाम होत नाही’, असं इस्राईली अभ्यासकांनी सांगितलं आहे.

इस्राईली अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासानंतर शंका दूर झाली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग मिळणार आहे. मागच्या अभ्यासात करोनामुळे शुक्राणूंवर परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये न्यूरोसायकियाट्रिक लक्षणं दिसून आली आहेत.

१९ हजार रुग्णांचा ५१ संस्थानी केलेला अभ्यास आणि सहा महिने देखरेखीखाली ठेवल्यानंतर ही बाब समोर आली आहे. करोनानंतर ७७ दिवस रुग्णांची देखरेख करण्यात आली.

त्यात २७.४ टक्के लोकांना झोपेची समस्या, २४.४ टक्के लोकांना थकवा, १९.१ टक्के लोकांमध्ये चिंता करण्याच्या प्रमाणात वाढ, तर १५.७ टक्के लोकांमध्ये मानसिक ताण असल्याचं दिसून आलं आहे.

तसेच चक्कर येणे ही बाब सामान्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. या बाबतचा संपूर्ण अहवाल मेडआरक्झिववर प्रकाशित करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe