अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जमिनीच्या वादातून कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील रहिवासी अण्णासाहेब मारुती चंदने (वय 40 वर्षे) यांना नऊ आरोपींनी मारहाण करून त्यांचा खून केला.
याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 9 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
मयत आप्पासाहेब मारुती चंदने हे आपल्या घरासमोर असतांना गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड, काठ्या घेऊन घरासमोर येऊन आरोपी बाबासाहेब राधाकिसन चंदने याने आप्पासाहेब मारुती चंदने यास मारहाण करण्यास सुरुवात केली.
यामध्ये आप्पासाहेब चंदनेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बाबासाहेब राधाकिसन चंदने, भूषण बाबासाहेब चंदने, सोमनाथ बाबासाहेब चंदने, प्रताप गणेश काटे, आकाश विकास चंदने,
सुनिता गणपत चंदने, गौरव गणपत चंदने, भाऊसाहेब निवृत्ती काटे, विलास कडू चंदने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयताच्या पत्नी वनिता अण्णासाहेब चंदने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नऊ आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम