वाळूची डंपर पेटवून दिल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रातील नायगाव परिसरातून वाळूची तस्करी सुरु असताना पोलीस व महसूल पथकाने संयुक्त छापा टाकला व यावेळी तीन डंपर जप्त करण्यात आले.

यातील डंपर पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना दोन डंपर अज्ञातांनी जाळले होते. आता याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यात नायगाव, गोवर्धन, सराला परिसरात वाळू तस्करांनी हौदास माजवला होता.

दरम्यान पोलीस व महसूल पथकाने रात्री नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात जावून कारवाई केली. त्यावेळी अंधारात अज्ञात आरोपींनी दोन वाळूच्या ट्रक पेटवून दिल्या.

त्यात ट्रकचे टायर जळून नुकसान झाले. अशाही परिस्थिती एक वाळूचा ट्रक व दोन ट्रक टायर जळालेल्या स्थितीत पोलिसांनी जप्त करुन तालुका पोलीस स्टेशनला आणल्या.

याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.पहिल्या गुन्ह्यात पो.ना. लोंढे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी हायवा डंपर चालक शेखर संजय जाधव, (रा. शिरुर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या गुन्ह्यात हे.कॉ. औटी यांच्या फिर्यादीवरुन टेम्पो व एक पांढर्‍या रंगाचा बिगर नंबरचा आयशर टेम्पो चालक व मालक तसेच अज्ञात लोकांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe