अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- कोविड पार्श्वभूमीवर शनिवारी संचारबंदी व कडकडीत राजूर बंद पाळण्यात येत असूनही राजूर येथून अवैध दारू सुरूच होती.
अवैध दारूविक्री करणाऱ्या दोन आरोपींना राजूर पोलिसांकडून मुद्देमालासह रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींवर कारवाई करून गजाआड करण्यात यश मिळवले.शनिवारी दुपारनंतर एक वाजताच्या सुमारास सपोनि साबळे यांना राजूर गावात राहुलनगर येथे विजय अदालतनाथ शुक्ला व संजय अदालतनाथ शुक्ला असे दोघेजण अवैध देशी दारुची विक्री करत होते.
सपोनि साबळे, पोसई खैरनार तसेच पोलिस कॉन्स्टेबल थोरात, गाढे, काळे, चालक मुळाणे, वाडेकर, चोखंडे यांनी राहुलनगर येथे जावून आरोपींच्या घरातून १२ हजार ४८० रुपये किंमतीचे ५ बॉक्स देशी दारू जप्त केली
यातील आरोपी राहुल अदालतनाथ शुक्ला (राहुलनगर, राजूर) यास ताब्यात घेतले. यातील दुसरा आरोपी संजय अदालतनाथ शुक्ला (राहुलनगर, राजूर) हा संधी साधून फरार झाला.
पोलिस कॉन्स्टेबल गाढे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|