मोक्का न्यायालयात कासार टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- वाळकी (ता. नगर) येथील कुख्यात गुंड विश्‍वजित रमेश कासार याच्यासह टोळीतील नऊ जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) एक हजार 320 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी येथील मोक्का विशेष न्यायालयात दाखल केले आहे.

नगर तालुक्यातील ओंकार बाबासाहेब भालसिंग यांची 17 नोव्हेंबर 2020 मध्ये मागील भांडणाचा राग धरून “ओंकार” दुचाकीवरुन जात असताना आरोपी विश्वजीत कासार व त्याचे साथीदारांनी समोरून धडक देवून खाली पाडून लोखंडी पाइप व दांडक्याने मारहाण केल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाला.

स्थानिक गुन्हे शाखेने 302 चा गुन्हा नोंदवून तपास केला. या गुन्ह्यातील सर्व 6 आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम ‘मोक्का’ लावून मोक्का न्यायालयात 1320 पानांचे दोषारोपपत्र काल सादर केले आहे. दरम्यान विश्‍वजित कासार याच्याविरुद्ध नगर, पुणे,

जालना जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे 22 गुन्हे दाखल आहेत. वाळकी येथील ओंकार भालसिंग यांच्या खूनप्रकरणात त्याचा समावेश आहे. त्यामुळे विश्‍वजित कासार याच्यासह त्याच्या टोळीतील नऊ जणांविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे.

आरोपींची नावे :- त्यात इंद्रजित रमेश कासार (वय 25), मयूर बापूसाहेब नाईक (वय 20), संकेत भाऊसाहेब भालसिंग (सर्व रा. वाळकी), सुनील फक्कड अडसरे (वय 26 रा. शेंडाळा, ता. आष्टी जि. बीड), शुभम बाळासाहेब लोखंडे (रा. करंडे, ता. शिरूर कासार, जि. बीड), सचिन भांबरे (रा. खेतमाळीसवाडी, ता. श्रीगोंदे),

भरत भीमाजी पवार (वय 26 रा. साकत, ता. नगर) व संतोष भाऊसाहेब धोत्रे (वय 26 रा. कारगाव, ता. आष्टी) यांचा समावेश आहे.पोलिसांनी विश्‍वजित कासार, सुनिल अडसरे, इंद्रजित कासार, मयूर नाईक, भरत पवार, संतोष धोत्रे यांना अटक केली असून, अन्य आरोपी पसार झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe