कुख्यात गॅंग तांदळे यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या कुख्यात नयन राजेंद्र तांदळे (वय 25, रा. भिस्तबाग नाका, सावेडी) याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली असून

आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे :- नयन राजेंद्र तांदळे (वय २५, रा. भिस्तबाग चौक, नगर), विठ्ठल भाऊराव साळवे (वय २७, रा. झापवाडी ता. नेवासा),

अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय २३, रा. प्रेमदान, सावेडी), शाहुल अशोक पवार (वय ३१), अमोल छगन पोटे (वय २८, दोघे रा. सुपा, ता. पारनेर) असे नावे आहेत.

सुपा (ता. पारनेर) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तांदळे व त्याच्या टोळीतील सदस्यांविरोधात सुपा पोलीस ठाण्यासह नगर शहरातील तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात दरोडा,

दरोड्याची तयारी, जबरी चोरी, लुटमार, शस्त्राचा धाक दाखवून लुटमार आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News