आचाऱ्याची आत्महत्या : ‘त्या’ आठ जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  शिर्डी संस्थानचे आचारी दिलीप बाबासाहेब सांबरे (४८, श्रीरामनगर-शिर्डी) यांनी कर्ज, लॉकडाऊन व परिवाराच्या जाचाला कंटाळून शुक्रवारी निळवंडे येथील खिंडीच्या जंगलात झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

त्यांच्या खिशात सापडलेल्या चिट्ठीवरून ८ जणांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिलीप सांबरे यांनी व्याजाने १५ लाखाचे कर्ज उचलले होते. लॉकडाऊनमुळे शिर्डी संस्थांमध्ये काम नव्हते. कर्ज देणारे व परिवराकडून त्यांना त्रास सुरु होता.

अखेर त्यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली. त्यांनी खिशातील डायरीत चिट्ठी लिहून ठेवली होती. पोलिस कॉन्स्टेबल विष्णु कान्हू आहेर यांच्या फिर्यादीवरून पत्नी अनिता दिलीप सांबरे,

वेणुनाथ सुर्यभान गोंदकर, भिमा बाळाजी जाधव (शिर्डी), नानासाहेब श्रावण जाधव, मंदा बाळाजी जाधव (शहा) व कर्ज देणाऱ्या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक फौजदार विजय खंडीझोड करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe