मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर प्रवास हिरोगिरी- माजीमंत्री बावनकुळे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबई च्या बाहेर येत नाहीत माञ हिरोगिरी दाखविण्यासाठी पंढरपूर ला गाडी चालवत जातात, शो-बाजी करतात शो-बाजी करायची असेल तर कोकणात मृत पावलेल्या लोकांच्या कुटूंबियांना मदत करा आणि शोबाजी करा, अशी टिका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवळाली प्रवरा येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केली..

देवळाली प्रवरा येथे भारतीय जनता युवा मोर्चाची आढावा बैठक भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम, संकेत बावनकुळे, उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,

माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, शहाजी कदम, पक्षप्रतोद सचिन ढुस, नगरसेवक बाळासाहेब खुरुद, ज्ञानेश्वर वाणी, अमोल कदम, भारत शेटे, सचिन सरोदे, सागर खांदे, चेअरमन राजेंद्र ढुस, व्हाईस चेअरमन सुधीर टिक्कल, सोपानराव शेटे, सोपानराव भांड, भाऊसाहेब गडाख दिगंबर पंडित, दिलीप मुसमाडे मच्छिंद्र कदम भीमराज मुसमाडे सचिन सरोदे आदी सह सर्व नगरसेवक, संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी उर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभेच्या 288 मतदार संघामध्ये प्रत्येक बुथवर पंचवीस युवा वारियर्स जोडण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चाच्या अभियानाद्वारे होणार आहे राज्यात 25 लाख युवकांचा युवा वारियर्सचे संघटन तयार करण्यात येणार आहे या युवकांचा राजकारणासाठी वापर करण्यात येणार नाही तर त्यांना त्यांच्या कलागुणांनुसार आत्मनिर्भर बनविण्यासाठी सगळ्याच तरुणांना नोकऱ्या मिळवून देवू शकत नाही परंतू त्यांचे आवडीचे व्यासपीठ उपलब्ध होवू शकते, राज्यातील सरकार फक्त मुंबई पुरते आहे.

गेल्या 14 महिन्यात मुख्यमंत्री मंञालयात गेले नाही, सरकारकडे निराधार योजनेस पैसे नाही, आदिवासी खावटी योजना बंद, एक हजार कोटीचा रोशन घोटाळा होतो, तरी सरकार शांत राहते, मुख्यमंत्री हिरोगिरी दाखविण्यासाठी गाडी चालवत पंढरपूरला जातात तुमची हिरोगिरी पुरग्रस्त भागात दाखवा, मराठवाडा वैधानिक महामंडळ बंद करण्यात आली आहेत,

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्या ऐवजी शेतीचे विज कनेक्शन तोडण्यात आले हे सरकार शेतकरीविरोधी आहे, मुंबईपासून सात किलोमीटर अंतरावर समुद्रात असलेले एलिफंटा पर्यटन स्थळावर वीज नव्हती फडणवीस सरकारच्या काळामध्ये पर्यटकांची गर्दी वाढविण्यासाठी 32 कोटी रुपये खर्च करुन 7 कि.मी. पाण्याखालुन आधुनिक तंत्रज्ञान वापरून लाईन टाकून विज पोहचवली, भ्रष्टाचारी सरकार बाजुला करावे लागणार आहे,

तीन चाकी सरकार लवकरच पंक्चर होणार आहे यांच्या तीन चाकीचे सुटेभाग घेण्यास कोणी येणार नाही, सरकार विकासाबद्दल बोलत नाही, दुष्काळाचे त्यांना देणे घेणे नाही असे माजीमंत्री बावनकुळे म्हणाले. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, तीन विचारधारेचे पक्ष सत्तेच्या लालसेपोटी व तिजोऱ्या भरण्यासाठी एकञ आले आहे,

युवकांसाठी राज्यात 19 आंदोलने करावे लागले, टक्केवारीचे सरकार असल्याने युवकांचे देणे घेणे नाही, राज्यात दिवसा ढवळ्या तरुणींवर आत्याचार होत आहे, पुजा चव्हाण या तरुणीवर मंञ्याकडून अत्याचार होतो तिला आत्महत्येस प्रवृत्त करतात, औरंगाबादमध्ये राष्ट्रावादीचा युवक अध्यक्ष बलात्कार करतो परंतू गुन्हा दाखल होत नाही, शक्ती कायद्यातून तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुट दिली आहे का? असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी सांगितले की युवाशक्ती ही परिवर्तनवादी शक्ती आहे युवा मोर्चा चे काम सर्वत्र अतिशय उत्तम आहे भाजपा हा पक्ष सामान्यांचे काम करणारा पक्ष आहे सर्वांच्या हिताचे काम करणाऱ्या पक्षांमध्ये मी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे

आम्ही पक्ष्याशी एकनिष्ठ राहिलो म्हणून आमदार की चा कार्यकाल झाल्यानंतरही पक्षाने मला कॅबिनेट मंत्रिपदाची व खासदार पदाची ऑफर दिली निवडणुकीत अंतिम वेळेपर्यंत ही संधी देण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही वयाची मर्यादा ओळखत निवडणुकीस उभे राहण्यास प्रामाणिकपणे नकार देऊन इतरांना संधी देण्यासंदर्भात सांगितले एका एका मताची किंमत आम्ही जाणून आहोत भाजपा मध्ये काम करणाऱ्यांना मोठी संधी आहे

अनेकांचे भवितव्य भाजपा मध्ये घडले गेले आहे युवकांना देखील मोठी संधी या पक्षांमध्ये आहे त्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. युवा शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाकडे आकर्षिली जात आहे भविष्यात ही शक्ती मोठी क्रांती घडू शकते. सत्यजित कदम यांनी सांगितले की देवळाली प्रवरा गावासह जिल्ह्यामध्ये युवकांचे मोठे संघटन केले केले आहे

देवळाली प्रवरा मध्ये मागील निवडणुकीमध्ये युवकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अभूतपूर्व यश निवडणुकीमध्ये आम्ही संपादित केले निवडणुकीमध्ये नियोजन गरजेचे असते ते नियोजन युवकांच्या माध्यमातून केले गेले होते आता जिल्हाभर युवक एकत्र करून मोठी युवाशक्ती भाजपा बरोबर उभे करून संघटनात्मक दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न केले जातील, येत्या निवडणुकांमध्ये मोठी युवाशक्ती आपल्याबरोबर असेल,

युवा वॉरियर्स च्या माध्यमातून युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश संसारे यांनी मांडले, सूत्रसंचालन सचिन ढुस यांनी केले तर आभार प्रदर्शन शहाजी कदम यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजयुमो च्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe