अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- महिला आणि बालविकास मंत्र्यालयाच्या हेल्पलाईन नंबर 1098वर एक फोन आला. या फोनवरून एका व्यक्तीने एका बालिकेचा गुजरातमध्ये नेऊन बालविवाह करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
त्यानंतर महिला आणि बालविकास मंत्र्यालय अॅक्शन मोडमध्ये आले. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना ही माहिती कळताच त्यांनी थेट आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था आणि बुलढाणा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी कारवाई सुरू केली. त्यानंतर त्यांनी गुजरातच्या गुजरात चाईल्ड लाईन आणि जोलवा येथील बालविवाह प्रतिबंधक आधिकारी यांना माहिती देण्यात आली.
जोलवाचे अधिकारी यांनी घटनास्थळी पोहचून हा बालविवाह रोखला. दरम्यान, गुजरातच्या जोलवा पोलीस चौकीत या प्रकरणात ‘बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006’ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
तर संबंधीत बालिकेच्या पुनर्वसनासाठी पुढील प्रकिया केली जात आहे. बालविकास मंत्र्यालयाच्या या तात्काळ कारवाईमुळे यशोमती ठाकूर यांच कौैतूक केलं जात आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|