अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- भारतात चाईल्ड पॉर्न सर्चच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही बाब अतीशय गंभीर बाब असून चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत कठोर कारवाईचे धोरण सरकारने निश्चित केले आहे.
तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉर्न व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्यामुळे सायबर सेलकडून अशा ग्रुपवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील फोटो,

व्हिडीओ अपलोड करून व्हायरल केल्याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस शिपाई सांगळे यांनी फिर्याद दिली आहे.
18 मे 2020 रोजी सदरचा गुन्हा घडला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडून प्राप्त टिपलाईनवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने इंस्टाग्रामवर लहान मुलांचे अश्लील फोटो, व्हिडीओ अपलोड केले.
यावरून सायबर टिपलाईन अहवालमधील सत्यजित शेळके असे नाव असलेल्या संशयिताविरूद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यावरून आरोपीचा शोध घेतला जाईल व त्याला अटक केली जाईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक कोळी यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













