अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- विळद बायपास वर रविवारी दुपारच्या सुमारास कंटेनर आणि कारचा अपघात होऊन पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघात एक नऊ वर्षाचा मुलगा सुदैवाने वाचला आहे.
या अपघातात रवींद्र किसन पाटील, मनिषा रवींद्र पाटील (रा. पाचोरा जि. जळगाव) यांचा मृत्य झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर-मनमाड महामार्गावरून पाटील कुटुंब त्यांच्या कारमधून पुण्याकडे चालले होते. विळद बायपास येथे दुपारी कंटेनरने कारला धडक दिली.
कंटेनरने कारला लांबपर्यंत ओढत नेले. पुढे जाऊन कंटेनर पलटी झाला. त्याखाली कार दबल्याने कारमधील पती-पत्नीचा जागेच मृत्यू झाला.
घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये पाटील यांचा नऊ वर्षाचा मुलगा वाचला आहे.
एमआयडीसीच्या पोलीस पथकाने विळद ग्रामस्थांच्या मदतीने त्या मुलाला सुखरूप बाहेर काढले. मृत पाटील दांपत्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम