सिनेस्टाईला पाठलाग करून अट्टल चोरटा केला जेरबंद बेलवंडी पोलिसांची कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे भर दुपारी ज्ञानेश्वर साहेबराव गाडेकर यांच्या बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून ६७ हजारांची चोरी करून पळून जाणाऱ्या संतोष नंदू भोसले (रा. औरंगाबाद) या अट्टल चोराला पळून जाताना चिखली येथील तरुणांनी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करत पकडले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात खून दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दखल आहेत. या बाबत सविस्तर असे की,

चिखली येथील गाडेकर यांचे कुटुंबातील सदस्य शेतात काम करत असताना दि.१३ मार्च रोजी दुपारी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून संतोष नंदू भोसले (रा.औरंगाबाद) या अट्टल चोराने ६० हजार रुपयांची सोन्याची दागिने आणि ७ हजार रूपये रोख अशी एकुण ६७ हजाराची चोरी करून पळून गेला.

चोरीचा प्रकार समजताच गाडेकर यांनी तत्काळ बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना खबर दिली असता, त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

त्याच वेळेस एक संशयित चिखली येथील माळावर असल्याची खबर मिळताच पोलिस नाईक ज्ञानेश्वर पठारे, संतोष गोमसाळे, अजिनाथ खेडकर यांनी स्थानिक तरुणांसह चोरट्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

त्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचेवर बिडकीन, कोतवाली, तुळजापूर वजिराबाद, लातूर, याठिकाणी खून दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe