अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकावर खूनी हल्ला करून आलेल्या दोघांनी एखाद्या चित्रपटाप्रमाणे रात्री नऊ वाजताच्या सुमारास रस्त्यावरील दुचाकी व चारचाकी वाहने अडवून हातातील कोयत्याने दिसेल त्या वाहनावर तसेच दुचाकीवरील नागरिकांवर कोयत्याने वार करत होते.
गुंडांची ही दहशत पाहून सर्वच वाहनचालकांनी आपली वाहने माघारी वळविली. जी वाहने समोर येत होती त्या वाहनांवर आरोपी कोयत्याने वार करीत होते. ही घटना पिंपरीतील पिंपळे निलख परिसरात घडली.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. आता पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
प्रतीक संतोष खरात आणि चेतन जावळे (दोघेही रा. पिंपळे निलख) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी आरोपींनी पैसे दिले नाहीत म्हणून एकावर कोयत्याने वार करीत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर बेभान झालेले हे दोघे आरोपी पिंपळे रस्त्यावर आले व गोंधळ घातला. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींची सांगवी पोलिसांनी त्यांची धिंड काढाली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम