अनधिकृत टपऱ्या काढण्यासाठी वेळोवेळी महानगरपालिकेत अर्ज देऊन देखील कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-  बोल्हेगाव गांधी नगर रोड येथील रस्त्याच्या लगत असलेल्या प्लॉट धारक रहिवासी नागरिकांच्या कुटुंबीयांना घरासमोर दहशत व गुंडागर्दी करून अनधिकृत टपऱ्या टाकून अतिक्रमण केल्यामुळे वहिवाटीचा रहदारीचा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी महानगरपालिकेच्या आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देताना रहिवासी हिम्मतराव मुरकुटे, सागर मुळे, वामन मोहोळकर, दादाराम गारुडकर,

अशोक भंडारी, देवदेवी यादव, रामाश्रय यादव, सहारा सय्यद, अनिसउद्दीन सय्यद, सिंधुताई सावंत, सुशीला फंड, अल्लाबक्ष पठाण, अण्णासाहेब नजन, पद्माबाई गावडे, बन्सी दरंदले, विलास कळमकर, नारायण झावरे, सुनिता राहिंज आदी उपस्थित होते. बोल्हेगाव गांधी नगर रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून येथील स्थानिक राजकीय पाठबळ असलेले गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी गुंडागर्दी करून रात्री-अपरात्री वेगवेगळ्या अनधिकृत टपऱ्या टाकलेल्या आहेत

तसेच बेकायदेशीर बांधकाम केलेले असून आम्हा सर्व प्लॉट धारकांना वहिवाटीचा रहदारीचा रस्ताच शिल्लक ठेवलेला नाही तेथे त्यांचे अवैद्य धंदे चालू आहेत तेथील वातावरण भीतीचे दहशतीचे व गुंडागर्दी चे झालेले असून सभ्य सुसंस्कृत समाजासाठी योग्य राहिलेले नाही आमच्यापैकी काहींचे हॉस्पिटल मेडिकल शाळा क्लासेस वेगवेगळी दुकाने आहेत परंतु वरील सर्व बाबींमुळे आम्हाला येथे त्रास सहन करावा लागत आहे

व आम्हाला येथे राहण्यास व व्यवसाय करण्यास अडचणीचे झाले आहे त्यामुळे अनधिकृत टपऱ्या काढून टाकण्यासाठी आम्ही वेळोवेळी महापालिकेतील संबंधित सर्व विभागांना अर्ज विनंत्या व निरंतर पाठपुरावा करून देखील अद्याप कुठल्याही ठोस कारवाई झालेली नाही अतिक्रमण विभाग मनपाचे अधिकारी कर्मचारी वरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी आले असता येथील राजकीय पाठबळ असलेले गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी त्यांची खाजगी जागा असल्याचे सांगून त्यांना कारवाई करून दिली नाही व अनधिकृत टपऱ्या काढून दिल्या नाहीत

अतिक्रमणाची कारवाईही मॅनेजमेंट सारखी जैसे थे आहेत महानगरपालिका अतिक्रमण विभाग आला आम्ही त्यांना आमच्या प्लॉट समोरील टपऱ्या काढुन आमचा वहिवाटीचा रहदारीचा रस्ता मोकळा करून देण्याची विनंती केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की जागा खाजगी आहे म्हणून येथील टपऱ्या आम्ही काढू शकत नाही

म्हणजे हेच अधिकारी ही रोडची जागा असल्याचे स्पष्टपणे लेखी नमूद करतात व तोंडी मात्र ती जागा खासगी असल्याचे सांगून टपर्‍या काढण्यास स्पष्ट नकार देतात ही दुटप्पी व संशयास्पद भूमिका आहेत त्यामुळे योग्य कारवाई करण्यास टाळाटाळ का करतात त्यामुळे आमच्या प्लॉट समोरील अनधिकृत टपऱ्या अद्याप काढलेल्या नाहीत उलट दिवसेंदिवस त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहेत

वरील सर्व बेकायदेशीर अतिक्रमण केलेले टपऱ्या त्वरित काढण्यात यावे अन्यथा 10 ऑगस्ट रोजी सर्व प्लॉट धारक रहिवासी नागरिक मनपा कार्यालयासमोर जोपर्यंत अनधिकृत टपऱ्या संपूर्ण काढल्या जात नाही तोपर्यंत सहकुटुंब अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe