अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेचा पुर्णपणे बोजवारा उडाल्याने नागरीकांना मरणयातना भोगतांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र कोपरगावात दिसून येत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.
कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात ट्रामा केअर युनिट इमारतीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी अंतिम टप्प्यात आणून ठेवली असतांना
गेल्या वर्षभरापासून विदयमान आमदारांनी सरकारकडे काहीच पाठपुरावा केला नसल्यामुळे आजच्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये रूग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होत असल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे.
कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये ट्रामा केअर युनिटची उभारणी करावी म्हणून माइया कार्यकाळात मी तत्कालीन आरोग्य मंत्री यांचेकडे सतत पाठपुरावा केला होता. शैक्षणिक संस्था,
सहकारी साखर कारखाने व औदयोगिक वसाहत यामुळे मोठया प्रमाणावर वाहतुक असल्याने दुदैवाने अपघात झाल्यास तातडीने अपघातग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालय येथे ट्रामा केअर युनिट व्हावे म्हणून तत्कालीन आरोग्य मंत्री यांचेकडे मागणी केली.
आचारसंहितेपुर्वी अंतिम टप्प्यात आलेली ही प्रक्रिया पुर्ण करून ट्रामा केअर युनिट इमारतीचे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विदयमान आमदारांकडून जनतेच्या जीवनमरणाशी संबधित असलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे, ही मतदार संघाच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे.
पाठपुरावा करून कोपरगाव येथे ट्रामा केअर युनिट कार्यान्वित झाले असते, परंतु पाठपुराव्याअभावी हे काम अदयापही रखडल्यामुळे सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या भयावह परिस्थितीमध्ये आरोग्यसेवा मिळण्यापासून नागरीकांना वंचित रहावे लागत आहे.
सदर ट्रामा केअर युनिटची इमारत पुर्ण झालेली असती तर आज त्या इमारतीचा उपयोग रूग्णसेवेसाठी झाला असता. असेही सौ कोल्हे म्हणाल्या.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|