अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- कोपरगाव शहर बसस्थानकामध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन पळणार्या दोन महिला चोरट्यांना प्रवाशांसह नागरिकांनी पाठलाग करून पकडून दिल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बसस्थानकामध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास सौ. रेखा नानाजी चव्हाण (वय 36) रा. धांद्री, ता.सटाणा, जि-नाशिक) या नातेवाईकांकडे जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/12/Crime.jpg)
त्या परत जात असताना दुपारी कोपरगाव बस स्थानक येथे आल्या होत्या यावेळी दोन अज्ञात अल्पवयीन मुली यांनी गर्दीचा फायदा घेत रेखा चव्हाण यांच्या अवतीभवती फिरुन त्यांची नजर चुकून त्यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत 24 हजार रुपये ओरबडून पळाल्या.
मात्र ही गोष्ट लक्षात येताच रेखा चव्हाण या आरडाओरडा करू लागल्या. ही गोष्ट इतर प्रवाशांचे नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी या दोन अल्पवयीन चोरी करणार्या मुलींना भाजी मार्केट रोड या ठिकाणी पकडले व तात्काळ पोलीस स्टेशनला कळवले.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या दोन मुलींना ताब्यात घेतले. या घडलेल्या प्रकाराबाबत रेखा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|