लसीकरण नोंदणीदरम्यान नागरिकांना जाणवतायत तांत्रिक अडचणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे जिल्हयात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार लसीकरण करण्यात देखील येत आहे.

यातच 18 वर्षावरील युवकांसाठी लसीकरणासाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र लसीकरण नोंदणीदरम्यान नागरिकांना तांत्रिक अडचणी जाणवू लागल्या आहेत. यामुळे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू शकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

करोना लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी असलेल्या वेबसाईटवर नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. वेबसाईट ओपन न होणे, झाल्यास लगेचच बंद होणे, त्यानंतर लसीचे बुकींग फुल्ल झाल्याचे दर्शविणे यामुळे अनेकजण नोंदणीपासून वंचित राहत आहेत.

असे असताना बाहेरगावच्या लोकांना मात्र लसीचा लाभ मिळत आहे. या अडचणीमुळे केवळ स्थानिकांना प्राधान्य देऊन त्यांचे लसिकरण करावे, अशी मागणी होत आहे. सध्या 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे;

परंतु नोंदणीसाठी देण्यात आलेल्या वेबसाईटचा वाईट अनुभव नागरिकांना येत आहे. दुपारी अडीच वाजेपासून ही वेबसाईट सुरू होते; परंतु दुपारी बारा वाजेपासून अनेकजण नोंदणासाठी प्रयत्न करीत असल्याने ती तातडीने सुरू होत नाही.

कधीतरी सुरू झाली तर वारंवार अचानकपणे बंद होते. त्यानंतर सुरू झाली तर त्यावर नोंदणी फुल्ल झाल्याचे दर्शविले जाते. त्यामुळे येथे केवळ स्थनिक नागरिकांना प्राधान्य देऊन त्यांचे लसिकरण करावे, अशी मागणी होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe