उकाड्यापासून नागरिकांना मिळाला दिलासा; शहरात गारांचा पाऊस

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ हवामानासह वारा सुटत होता. रविवारी (दि.21) दुपारी साडेचार वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासह वारा सुटला अन् वीजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

मागील दोन दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने रविवारी सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना संध्याकाळनंतर दिलासा मिळाला.

मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नागरिकांना रात्रीची झोपदेखील असह्य होत होती; मात्र पावसामुळे रात्री नागरिकांना अल्हाददायक वातावरणाने दिलासा मिळाला. नगर शहरात रविवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील विविध भागात आणि एमआयडीसी परिसरात छोट्या स्वरूपात गारा पडल्या. यावेळी यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. साधारण अर्धा तास पावसाने नगर शहराला झोडपून काढले यासह नगर दक्षिणेच्या काही तालुक्यांमध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी गारपीट झाल्याचे वृत्त आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News