अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-बेसुमार वाळू उपशामुळे भविष्यात पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेत शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावने येथील नागरिकांनीच पुढाकार घेवून नदीपात्रातील वाळूउपसा व वाळूचा जाहीर लिलाव करण्यास विरोध केला.
तालुक्यातील ढोरजळगावने येथील ढोरा नदीवरील वाळूचा जाहीर लिलाव करण्यास ग्रामस्थांच्यावतीने वतीने तीव्र विरोध केला आहे. वाळू चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेची असल्याने शासकीय यंत्रणेमार्फत बेकायदेशीर वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी.

तसेच ढोरा नदी पात्रातील वाळू चोरीस ग्रामपंचायत जबाबदार राहणार नसून, शासकीय योजनेतील घरकुल बांधकामासाठी गावातील व्यक्तीला पाच ब्रास वाळू उचलण्यास परवानगी देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
यावेळी महसूल विभागाच्यावतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ढोरजळगावनेच्या सरपंच गौरी आनंता उर्किडे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या विशेष ग्रामसभेस मंडल अधिकारी रमेश सावंत तलाठी प्रदीप मगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved