नागरिकांनो लक्ष द्या; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते.

मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. तसेच कोरोनाचा धोका वाढू लागल्याने प्रशासन देखील पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे.

नुकतेच कोपरगावात नगर येथील अहवालात ५, खासगी लॅब १० असे एकूण १५ रुग्ण शनिवारी ( दि. २० फेब्रुवारी ) कोरोना बाधित आढळले आहेत.

यातील ३४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १८ इतकी झाली आहे,

अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. शनिवारी बाधित आलेल्या रुग्णामध्ये शहरातील राममंदिर ५,

निवारा १, भगवती कॉलनी १, टिळकनगर १, श्रद्धानगरी १, साईसिटी १, समतानगर १, कोपरगाव १, तर तालुक्यातील वारी १, पोहेगाव १, बक्तरपूर १ येथील रुग्णांचा समावेश आहे.

कोपरगाव शहरासह तालुक्यात पुन्हा रुग्ण वाढ होत असल्याने नागरिकांनी कोरोना संदर्भातील सर्व नियमाचे पालन करावे, असे आवाहन डॉ. फुलसौंदर यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe