कर थकविलेल्या जिनिंगवर नगर परिषदेची धडक कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-  मालमत्ता कर थकविल्याने शेवगाव नगर परिषद हद्दीतील दोन जिनिंग मिलवर प्रशासनाने कारवाई केली आहे. दरम्यान प्रशासनाने आक्रमक कारवाई करत या दोन्ही जिनिंगला टाळे ठोकले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगाव शहरातील खुंटफळ रोडवरील थिरेश सूर्यकांत मोता यांच्या मालकीची सिद्धिविनायक जिनिंग मिल यांच्याकडे २९ लाख ८१ हजार १६५,

तर द्वारकानाथ बन्सीधर लाहोटी यांच्या नाथ जिनिंग मिलकडे २० लाख ७० हजार ८४६ रुपये मालमत्ता कर थकल्याने कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही जिनिंगवर कारवाई केली आहे.

प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या सूचनेनुसार, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये डी. सी. साळवे यांच्या नेतृत्वाखाली कर निरीक्षक डी. डी. कोल्हे, अशोक सुपारे, अनिल लांडे आदीं सहभागी होते.

तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते संत गाडगेबाबा चौकादरम्यानच्या अतिक्रमणधारकांना पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe