दनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- सध्या पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रोज कुठे ना कुठे घरफोडी केल्यच्या घटना घडत आहेत. आता तर चोरट्यांनी आमदार मोनिका राजळे
यांचे गाव असलेल्या कासार पिंपळगाव येथे एका जनरल स्टोअर्स व किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ६० हजारांचे साहित्य लंपास केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कासार पिंपगळगावातील दुकानदार बाळू पगारे हे सकाळी दुकान चालू करण्यासाठी गेले असता, दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचे शटर तोडून दुकानातील सौंदर्य प्रसादने तसेच खाद्य तेलाचे डबे, असे एकूण ६० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले असल्याची माहिती पगारे यांनी दिली.
चोरट्यांनी दाट लोकवस्तीत दुकान फोडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पाथर्डी-मिरीकडे जाणारा रस्त्यावर रात्रीही रहदारी असते.
पाथर्डी पोलिस स्टेशनचे बीट हवालदारयांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. पाथर्डी पोलिस पुढील तपास करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम