अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- जिल्ह्यात करोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव वाढल्याने 15 एप्रिलपासून राज्यात पुन्हा दुसर्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान साधारणपणे पाच महिने 9 वी ते 12 चे वर्ग भरले होते.
आता दुसरी लाट ओसत असल्याचे पाहुन राज्य सरकारने 8 वी ते 12 वीपर्यंत शाळांचे वर्ग भरविण्यास अटी शर्तीसह परवानगी दिली आहे. करोनाची दुसरी लाटेचाप्रभाव कमी झालेल्या आणि करोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये यंदा 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सध्या 845 ग्रामपंचायती करोनामुक्त असून या ठिकाणी टप्प्याने शाळा सुरू होवू शकते, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली.
दरम्यान जिल्ह्यात सध्या 845 करोनामुक्त ग्रामपंचायती असून त्याठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती आणि गावच्या ग्रामपंचातीने पालकांच्या समंतीने ठराव घेतल्यास करोना नियमांचे पालन करून टप्प्याने शाळा सुरू होवू शकतात.
यात शिक्षकांची करोना चाचणी, शाळा आणि परिसर निर्जंतुकीकरण यांसह कोविड नियमांचे सर्व पालन करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम