जिल्हाधिकारी म्हणाले… नगरकर लॉकडाऊनची वेळ जिल्ह्यात येऊ देणार नाहीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी नियमांचे पालन ही सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हावासीय हे नियम निश्चित पाळतील आणि लॉकडाऊनची वेळ जिल्ह्यात येऊ देणार नाहीत,

अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी गेले दोन दिवस करोना रुग्णसंख्या सातत्याने वाढती असलेल्या संगमनेर, राहाता, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांचा दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या असून बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश भोसले यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, तालुकास्तरावर आता कोव्हिड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास सांगितले आहे. डीसीएचसीही सुरू करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी आवश्यक असणारी औषधे जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

एकीकडे करोना प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरण मोहीमही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. करोनापासून बचावासाठी सार्वजनिक अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, चेहर्‍यावर मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe