आ. डॉ.तांबे यांच्या पाठपुराव्यातून दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता याबाबत आ.डॉ.सुधीर तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन महिन्यांमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले

व आज त्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला असून यामुळे दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की इतर विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता .

मात्र विशेष व्यक्तींसाठी काम करणाऱ्या दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू झालेला नव्हता यासाठी यासाठी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी वारंवार पाठपुरावा केला.

तसेच सहाव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी देखील पाठपुरावा केला होता . तसेच दिव्यांग शाळांच्या कुठलाही प्रश्न असेल तो सोडविण्यासाठी आ.डॉ.सुधीर तांबे हे शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करत असतात.

सातव्या वेतन आयोग लागू करण्यासाठी दिव्यांग शाळा कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासोबत पाठपुरावा केला.

शासन या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असून या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात,

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच विशेषतः नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे या सर्वांचे राज्यातील दिव्यांग शाळा कर्मचारी संघटना व महासंघाने अभिनंदन केले आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe